Tuesday, May 26, 2026
Homeगोंदियावन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री; तीन आरोपी अटकेत.. - २२ नग वाघ व...

वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री; तीन आरोपी अटकेत.. – २२ नग वाघ व बिबट्यांच्या मिश्या सह देशी कट्टा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सडक अर्जुनी शहरात वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवळल्याची घटना काल बुधवार १९ फेब्रुवारीला उघडकीस आली.प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना सडक अर्जुनी येथून ताब्यात घेत विठ्ठल मंगरू सराटी रा.दल्ली हल्दीटोला,ता.सडक अर्जुनी,हरीश लक्ष्मण लांडगे रा. मुंडीपार,सडक,ता.साकोली,जि.भंडारा, घनश्याम शामराव ब्राम्हणकर रा.पिपरी राका,ता.सडक अर्जुनी
अशी आरोपींची नावे असून आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३५,३९, ४४, ४८,(ए) ४९,बी ५०,५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिन्ही आरोपींना अटक करून काल बुधवारी १९ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
माहितीनुसार,नागपूरचे विभागीय वन अधिकारी पी.जी.कोडापे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ,बिबट्या वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी वनपरिक्षेत्रात सापळा रचण्यात आला व बनावट ग्राहक तयार करून आरोपींसोबत बोलणी करून त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील परिसरातून काल बुधवारी ताब्यात घेतले.तिन्ही आरोपींना वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी येथे नेण्यात आले.यातील आरोपी विठ्ठल मंगरू सराटी याची अंगझडती घेतली असता त्याच्यावजळ वाघ,बिबट्या यांच्या २२ नग मिश्या,खवले मांजराचे दोन दात व एक देशी कट्टा पिस्तूल आढळले.तर आरोपी हरीश लांडगे,घनश्याम ब्राह्मणकर यांची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे काही आढळले नाही.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी केली असता तिन्ही आरोपी हे वाघ,बिबट्या वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव विक्री करण्याचे व्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले.सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी नागपूर पी.जी.कोडापे,नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेफ, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार,सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे,वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक रवी भगत, छबुकांता भडांगे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!