Thursday, October 22, 2026
Homeकुरखेडावनपरिक्षेत्राधिकारी ठाकरे यांच्या हस्ते अस्वलाच्या हल्ल्यात जखमीस ५ लाखांचा धनादेश प्रदान..

वनपरिक्षेत्राधिकारी ठाकरे यांच्या हस्ते अस्वलाच्या हल्ल्यात जखमीस ५ लाखांचा धनादेश प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):- कुरखेडा तालुक्याच्या चारभट्टी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सिंदेसूर येथील पतीराम चन्नू तूलावी वय ३३ वर्षे हा आपल्या शेतात काम करीत असताना ३० जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जंगलात असलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते.यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होते.वनपरिक्षेत्र कार्यालय कुरखेडा यांच्यावतीने पंचनामा करीत मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.प्रस्तावाला मान्यता मिळताच पीडित पतीराम तुलावी यांना बोलावून पाच लाखांचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी क्षेत्र सहायक एस.एल.शेंडे, वनकर्मचारी कादर शेख उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!