Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीलोकसभा निवडणूक; मतमोजणीसाठी गडचिरोली प्रशासन सज्ज..

लोकसभा निवडणूक; मतमोजणीसाठी गडचिरोली प्रशासन सज्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यात दिनांक- १९ एप्रिल २०२४ रोजी गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून कृषी विद्यापीठाच्या इमारतीत सुरु होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे.गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आमगाव, आरमोरी,गडचिरोली,अहेरी,ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे.प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता १४ टेबल याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ८४ टेबल लावण्यात आले आहेत.तसेच टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीसाठी १२ टेबल व इलेक्ट्रॉनिकली ट्रांसमिटेड पोस्टल बैलेट सिस्टम (ईटीपीबीएस) साठी एक टेबल असे एकूण ९७ टेबलवर मतमोजणी होणार आहे. 

विधानसभानिहाय मतमोजणीच्या फेऱ्‍या👇

आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या,आरमोरी मतदारसंघात २२ फेऱ्‍या, गडचिरोली करीता २६ फेऱ्‍या,अहेरी करीता २१ फेऱ्‍या, ब्रम्हपुरीकरिता २३ फेऱ्‍या आणि चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या राहणार आहेत.यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातून सोडत पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी ५ व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.

मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय व प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून एकूण ११७ मतमोजणी पर्यवेक्षक,१३० मतमोजणी सहायक,१२० सुक्ष्म निरीक्षक व इतर १०१ सहायक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.प्रत्येक उमेदवाराला इव्हीएम मतमोजणी,इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे ९७ प्रतिनिधी  नेमता येणार आहे.त्यासाठी फॉर्म १८ भरणे आवश्यक आहे. मतमोजणी कक्षात प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

मतमोजणीस्थळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकरिता कम्युनिकेशन कक्ष,पत्रकारांसाठी मीडिया कक्ष तसेच उमेदवारांकरिता कक्ष स्थापन केलेला असून सर्व कक्ष सुसज्ज आहेत.संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.वीज पुरवठा अखंड सुरु राहावा; यासाठी  जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले दोन निवडणूक निरीक्षक,उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे. मतमोजणीस्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेची देखरेख आहे.यात बाह्य स्तरावर महाराष्ट्र पोलिस दल,दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलिस दल तर आतील स्तरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत.मतमोजणी कक्षात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु,तसेच निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेल्या वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!