Sunday, July 26, 2026
Homeनागपूरलॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा..!

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्याबाबत स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.अश्यातच डोक्यावरून पाणी जाताच म्हणजेच आता कारवाई केलीच पाहिजे असे म्हणत नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळमेश्वर शहरातील आकाशनगर परिसरातील सुदर्शन गेस्ट हाउस लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली.या कारवाईत लॉजचा मालक जितेंद्र गोविंद कोल्हे आणि व्यवस्थापक अजय नंदकिशोर डेहरिया यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.बोगस ग्राहकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पडताळणीत लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान एका महिलेची सुटका करण्यात आली.मोबाइल फोन,रोख रक्कम व गेस्ट रजिस्टरसह १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्राथमिक तपासात लॉजमध्ये महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.सदरची कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे,पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कळमेश्वर पोलिसांच्या सहकार्याने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!