Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाभार्थ्यांचे आधार कार्ड वरील स्कुआर कोड होणार स्कॅन......

लाभार्थ्यांचे आधार कार्ड वरील स्कुआर कोड होणार स्कॅन……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे.हे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या अद्वितीय बारा अंकी क्रमांकासह मुद्रित केले जाते.हा क्रमांक भारतात कोठेही व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे. यापुढे शासकीय योजनेतील लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड स्कॅन करून प्रमाणित करण्यात येणार आहे.

आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे.सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते. बँक खाते उघडायचे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो की एलपीजी सिलिंडरचे अनुदान असो,आधार क्रमांकाची जवळपास सगळीकडे मागणी केली जाते.पि एम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेत आधार कार्डचा वापर करण्यात येतो. काही शासकीय योजना आधार कार्ड वरील वय गृहीत धरून मान्य केल्या जातात.यात बरेच नागरिक मॅन्युअल पद्धतीने बोगस आधार कार्ड बनवून शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतात.यात शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे समाजातील गरीब, पात्र व वंचित घटकाला या योजनेपासून वंचित राहावे लागते.

यापुढे शासनाने शासकीय योजनात वापर करण्यात येत असलेल्या आधार कार्डचे क्यूआर कोड स्कॅन करून प्रमाणित केल्यानंतर शासकीय योजनांचा लाभ देण्याचे ठरविले आहे.यामुळे बोगस लाभार्थी आपोआप प्रशासनाला ठरविता येणार आहे.तसेच शासकीय योजनेत नागरिकांनी सादर केलेल्या आधार कार्ड बाबत खोटी माहिती आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे शासनाने ठरविले आहे.

आधार कार्ड मध्ये वय,फोटो यात मॅन्युअल पद्धतीने खोडतोड केल्या जाते.हा आधार कार्ड शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नागरिकांकडून सादर केल्या जातो.परंतु क्यू आर कोडला बदलविता येत नाही.आधार कार्ड सोबत पडताळणी फार्ममध्ये इतर पदाधिकारी यांची संमती असल्याने त्या लाभार्थ्याला काही विशिष्ट योजनेतून बाहेर काढता येत नाही. त्यामुळेच आधार कार्ड वरील क्यू आर कोड प्रमाणित करण्याचे शासनाकडून ठरविण्या आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!