- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी केल्याशिवाय महिण्याकाठी मिळणाऱ्या दीड हजाराची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार नसल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.त्यानुसार,ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असल्याने अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया तर पूर्ण केली; पण ई-केवायसी पूर्ण करतेवेळी लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडतांना चुकीचा पर्याय निवडला गेला.त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात दीड हजाराची रक्कम जमा होणे बंद झाल्याने राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते व शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना आश्वासन देऊन कुणीही लाभापासून वंचित राहू नये,याकरीता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्या गेले होते.त्यानुसार,महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल आज,शुक्रवार ६ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु केले आहे.त्यामुळे आजपासून या पोर्टलवरुन ई-केवायसीची दुरुस्ती ३१ मार्च २०२६ पर्यंत करता येणार आहे.राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन परिपत्रक काढून पोर्टल सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
- ई-केवायसीसाठी👇
ई-केवायसी करण्यासाठी https://ladakibahin. maharashtra.gov.in या वेबसाईट वर जावे.
- Advertisement -

