Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीआणखी दोन नक्षलवादी ठार; एक जवान शहीद..

आणखी दोन नक्षलवादी ठार; एक जवान शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.अश्यातच परिसरात शोध मोहिमेदरम्यान आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे; मात्र,यात एक जवान शहीद झाला.तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटायची आहे.चकमकीत गंभीर जखमी  सी-६० पथकाचा जवान दीपक चिन्ना मडावी वय ३८ वर्षे,रा.मांड्रा(दामरंचा),ता.अहेरी,जि.गडचिरोली यास आज शुक्रवारी पहाटे हेलिकॉप्टरने भामरागड येथे नेण्यातआले.मात्र,त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.तर जोगा मडावी,रा.किष्टय्यापल्ली हा जवान गोळी लागल्याने जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर आहे.
मंगळवार ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे नक्षलवादी आणि छत्तीसगडमधील काही नक्षली फोदेवाडा परिसरातील जंगल परिसरात छपून बसल्याची माहिती मिळताच भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. बुधवार ४ फेब्रुवारीला दिवसा झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले.त्यानंतर काल गुरुवारी सकाळपासून पुन्हा सी-६० पथक,केंद्रीय राखीव दल व जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास प्रारंभ केला.यावेळी नक्षल्यांशी जोरदार चकमक उडाली.पोलिसांनी घटनास्थळावरुन एका नक्षल्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता.पुन्हा दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. यात दोन पुरुष व एका महिला नक्षलीचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एके ४७ व एक एसएलआर रायफल जप्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!