Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. ई-केवायसी करतांना चूक झाली असेल तर दुरुस्ती करून...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. ई-केवायसी करतांना चूक झाली असेल तर दुरुस्ती करून घ्या; आजपासून पोर्टल सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी केल्याशिवाय महिण्याकाठी मिळणाऱ्या दीड हजाराची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार नसल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.त्यानुसार,ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असल्याने अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया तर पूर्ण केली; पण ई-केवायसी पूर्ण करतेवेळी लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडतांना चुकीचा पर्याय निवडला गेला.त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात दीड हजाराची रक्कम जमा होणे बंद झाल्याने राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते व शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना आश्वासन देऊन कुणीही लाभापासून वंचित राहू नये,याकरीता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्या गेले होते.त्यानुसार,महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल आज,शुक्रवार ६ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु केले आहे.त्यामुळे आजपासून या पोर्टलवरुन ई-केवायसीची दुरुस्ती ३१ मार्च २०२६ पर्यंत करता येणार आहे.राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन परिपत्रक काढून पोर्टल सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
  • ई-केवायसीसाठी👇
ई-केवायसी करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!