- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करतांना ज्या लाभार्थी महिलांनी चुका केल्या,अश्या महिलांसाठी पुनश्च ई-केवायसीसाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या दोन महिन्याच्या लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, योजनेतील पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिलेत.त्यानुसार,सदरचे दोन हप्ते पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार,सदरचे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा १५ एप्रिलपूर्वी बँक खात्यात वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता.तेव्हापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या.महिना संपला तरी लाभ मिळायचा आहे.पण,आता त्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळणार आहेत.
- Advertisement -

