- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.अश्यातच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळेल असे फडणवीस सरकारने आधीच जाहीर केले.पण,काही कुटुंबातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे.
या व्यतिरिक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठीच लाडकी बहीण योजना असतांना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असूनही योजनेचे लाभघेतल्याचे सिद्ध झाले आहे.आता या गैरफायदा घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला,मुलींना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.या योजनेची नियमावली सरकारने आधीच जाहीर केली आहे.पण नियमांना डावलून स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन काही महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे.यामुळे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू केली आहे.गैरफायदा घेणाऱ्या तसेच नियमात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.काही कुटुंबांतील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतांनाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने फेरपडताळणी करण्यात आली.त्यातच आता सरकारने मोठे पाऊल उचलत दोन महिन्यात ‘ई- केवायसी’ न केल्यास पुढील कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे शासन परिपत्रक काढले आहे.
- Advertisement -

