Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाच दिली नाही म्हणून चक्क अर्जदाराचाच बनवला मृत्यूचा दाखला... - जिल्हाधिकाऱ्यांनी दखल...

लाच दिली नाही म्हणून चक्क अर्जदाराचाच बनवला मृत्यूचा दाखला… – जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत ग्रामसेवकास केले निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कर्मचारी किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो,याची प्रचिती उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्याच्या अटवा गावात उघडकीस आले आहे.अटवा येथील रहिवासी विश्वनाथ यांच्या पत्नी शांती देवीचे १९ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. विश्वनाथ आपल्या पत्नीच्या मृत्यू प्रमाणपत्राकरिता ग्रामपंचायत सचिव(ग्रामसेवक) सरिता देवी यांच्याकडे गेले होते.सुरुवातीला सरिता देवी मृत्युपत्र देण्याकरिता चालढकल करीत होत्या.नंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी विश्वनाथकडे २ हजार रुपयांची मागणी केली.ही मागणी करताच विश्वनाथ यांनी लाच देण्यास नकार दिला व प्रमाणपत्र देण्याची मागणी केली.विश्वनाथ यांनी लाच न देण्याच्या भूमिकेमुळे सचिवांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वारंवार चक्रा मारायला लावल्या.अखेर ३ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत सचिवांनी त्यांना मृत्यू प्रमाणपत्र बनवून दिले.विश्वनाथ यांनी ते प्रमाणप्रत्र पाहिले तेव्हा त्यावर पत्नी शांती देवी नावा ऐवजी त्यांचे स्वत:चे नाव त्यावर होते.हे पाहताच विश्वनाथ यांना धक्का बसला. लाच देण्यास नकार दिल्याने हा प्रकार सचिवांनी त्यांच्यासोबत केल्याचे विश्वनाथ यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकाराची हरदोई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजून घेत तात्काळ कारवाई करीत सरिता देवी यांना निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध एफआयआर(FIR) दाखल करण्यात आला व त्याचवेळी बीडियो(संवर्ग गट विकास अधिकारी) यांनी स्वत: विश्वनाथ यांच्या घरी जाऊन शांती देवीचे मृत्यू प्रमाणपत्र दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!