Friday, October 16, 2026
Homeनागपूरलहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये आढळली मृत चिमणी…

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये आढळली मृत चिमणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पोषण आहारात मृत चिमणी आढळल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोषण आहार पुरवठा धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर जिल्ह्यात पोषण आहारामध्ये चिमणी आढळली आहे.नागपूरात पारशिवानी तालुक्यातील घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लहान मुलांच्या आहारात मृत चिमणी आढळल्याने खळबळ उडाली आहे.निल नेहाल शिंदेकर यांच्या घरी देण्यात आलेल्या पोषण आहारात ही मृत चिमणी आढळली आहे.० ते ३ वयोगटातील मुलांना हा पोषण आहार दिला जात होता.

पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्षाने ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!