Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरलग्नास नकार देणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल..

लग्नास नकार देणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सुरुवातीला सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर मैत्री,मैत्रीचे रुपांतर प्रेमात,प्रेमात आणाभाका,लग्नाचे आमिष,नंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध,नोकरी लागताच संपर्क तोडण्याचा प्रयत्न, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीची पोलिसांत धाव आणि चक्क उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यावर शोषण केल्या प्रकरणी नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.दर्शन दुगड वय ३० वर्षे,रा.यवतमाळ असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.पीडित युवती एका खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.तर आरोपी पोलीस अधिकारी सध्या नंदुरबार जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर कार्यरत आहे.
उच्चशिक्षित डॉक्टर युवतीचे बऱ्याच दिवसांपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासोबत प्रेमप्रकरण असल्याने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी लग्नाचे आमिष दाखविले व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.तत्पूर्वी आरोपी पोलीस उपविभागीय अधिकारी नव्हता म्हणजेच आयपीएस अधिकारी नव्हता.जशी नोकरी लागली व उपविभागीय अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर पिडीत युवतीशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न सुरू होता.त्यातच डॉक्टर युवतीने लग्नाची इच्छा व्यक्त करताच शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टर युवतीने नागपूरच्या इमामवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार इमामवाडा पोलिसांनी उपविभागीय अधिकारी दर्शन दुगड विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने कोणी कितीही मोठा असो,कायदा हा सर्वांसाठी समान असल्याची प्रचिती सदर प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!