- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी मोबाईलची लहानशी डब्बी असल्याने ना ऑनलाईन फसवणूक होत होती,ना कोणत्या सापळ्यांचा वापर व्हायचा वा तसे प्रकारही घडले जात नव्हते.मात्र,नव्या तंत्रज्ञानामुळे लहानशा डब्बिची जागा अँड्रॉइड फोनने घेतली आहे.आता सर्वसामान्य नागरिकांपासून ते सर्वांकडे अँड्रॉइड फोन आले.त्यामुळे जो-तो ऑनलाईन व्यवहाराकडे वळलेला दिसून येतो.त्यातच सायबर चोरटे वेगवेगळे फंडे वापरून ऑनलाईन फसवणूक करतांना दिसून येतात.हल्ली सायबर चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे सायबर चोरट्यांनी आता नवा फंडा सुरू केला आहे.चोरटे हे तुमच्या बँकेतील रकमेवर डल्ला मारण्याच्या तयारीत असतात.नव्या फंड्यामध्ये ते तुम्हाला ना लिंक पाठवतात,ना ओटीपी मागतात.तर सरळ-सरळ तुम्हाला फोन करून तुमचा विश्वास संपादन करतात व गंडा घालण्यासाठी कॉन्फरन्स कॉल म्हणजेच कॉल मर्ज या नव्या सापळ्याचा वापर करतात.यामध्ये तुम्हाला कॉल येतो व तो सांगतो वेटिंग वर असलेला कॉल उचला,त्याला लाईनवर घ्या,कोणती ना कोणती नवी शक्कल, कोणता ना कोणता बहाना बनवून हे सायबर चोरटे तुम्हाला वेटिंगवर आलेला कॉल उचलण्यास भाग पाडतील.वेटिंग वर आलेला कॉल हा तुमच्या ओटीपी संदर्भात असतो.ओटीपी ऐकताच दोन्ही कॉल कट होतात व तुमचे बँक खाते पूर्णपणे साफ केले जाते.
म्हणजेच तुमच्या बँक खात्यातील रक्कम अगदी काही सेकंदात सायबर चोरट्यांच्या खात्यात जाते.अशा प्रकारे लोकांना गंडा घातला जात असल्याने एनपीसीआय (NPCI)ने असे कॉल मर्ज करू नका अशा सूचना दिल्या आहेत.त्यामुळे वेटिंगवर आलेला कोणताही कॉल उचलण्याआधी एकदा नक्की विचार करा.कधीही अनोळखी कॉल मर्ज करू नका. कोणीतरी तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून आता एक कॉल येईल,तो मर्ज करा असे सांगेल.तर तो स्कॅम आहे हे समजा.फसवणूक झालीच तर ताबडतोब सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर १९३० वर कॉल करा व फसवणुकीपासून बचाव करा.
- Advertisement -

