Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरुपयाची घसरण चिंताजनक; महागाईचे संकेत..

रुपयाची घसरण चिंताजनक; महागाईचे संकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आज भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झाली.त्यामुळे,भारतीय चलन बाजारासाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला.आज,सोमवार ११ मे रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.२५ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. रुपयाने प्रथमच ९५ रुपयांच्या पलीकडे पातळी ओलांडल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे.कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय,आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि खाद्यतेले यांच्या किमतीतही वाढ होऊ शकते.जे नागरिक परदेश प्रवासाचे किंवा शिक्षणाचे नियोजन करत आहेत,त्यांना आता डॉलर खरेदीसाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळल्याने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे.परिणामी,सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे ओघ वाढला आहे.जागतिक तणावामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल काढून घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया सावरण्याचा प्रयत्न केला असला,तरी जागतिक स्तरावरील दबावामुळे रुपयाची घसरण रोखणे कठीण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!