- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-सकाळच्या सुमारास शेताकडे निघालेल्या वाटेत अचानकपणे समोर आलेल्या रानगव्याने शेतकऱ्याच्या पोटात शिंगे खुपसल्याने शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव-शहारवाणी मार्गावरील शेतशिवार परिसरात घडली.नीलकंठ नंदलाल तुरकर वय ५७ वर्षे,रा.सोनेगाव, ता.गोरेगाव,जि.गोंदिया असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनला लागूनच गोरेगाव तालुका आहे.त्यामुळे परिसरातील हिंस्त्र प्राणी वा इतर वन्य प्राण्यांचे नागरिकांना नेहमीच दर्शन होत असते.अश्यातच आज रविवारी सकाळच्या सुमारास सोनेगाव येथील शेतकरी नीलकंठ तुरकर हे गावातील चौकात काहीकाळ गप्पा मारून शेताकडे निघाले होते.दरम्यान,शेतशिवारातील जंगल परिसरातून एक विशालकाय रानगवा अचानकपणे नीलकंठ यांच्यासमोर उभा झाला आणि थेट पोटात शिंगे खुपसली.यात रक्तबंबाळ झालेले शेतकरी नीलकंठ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदरची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.रानगवा दिसताच गावकऱ्यांनी रानगव्याला तिथून पिटाळून लावले.रानगवा एवढ्यावरच थांबला नाही,तर सोनेगाव येथून पळाल्यानंतर त्याने कवलेवाडा आणि चिचगावटोला परिसरात शिरकाव केला.प्रसंगी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करीत रानगव्याला हुसकावून लावले.अचानक घडलेल्या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
- Advertisement -

