Thursday, October 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'यूपिआय' वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच ‘मर्चेंट डिस्काउंट रेट’ शुल्क लागू करण्यात येणार होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर एमडीआर लागू केल्यास ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर आणि बाजारातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच सर्वसामान्य ग्राहक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतला आहे. यूपीआयद्वारे होणाऱ्या विशिष्ट मर्चेंट व्यवहारांवर लागू करण्यात येणारे मर्चेंट डिस्काउंट रेट शुल्क १५ ऑक्टोंबर ऐवजी आता दिवाळीनंतर लागू करण्यात येणार आहे. एनपीसीआयच्या ‘यूपीआय अँड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटी’च्या बैठकीत आज मंगळवारी यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने ग्राहकांपासून ते व्यापारी संघटना आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सनी समाधान व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे,मर्चेंट डिस्काउंट रेट शुल्क आकारणी बाबत दिवाळीनंतर तारीख जाहीर करण्यात येणार आहे.तोपर्यंत ग्राहक तसेच व्यापारी वर्गांना दिलासा मिळाला आहे.प्रस्तावित ‘मर्चेंट डिस्काउंट रेट शुल्क’ केवळ व्यापारी वर्गांसाठी असून,सामान्य ग्राहकांसाठी यूपिआय द्वारे केले जाणारे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे पूर्णपणे मोफत राहतील.दोन हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या निवडक व्यावसायिक व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे.तर ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या व्यवहारांवर कमाल शुल्क ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.ज्या लहान व्यापाऱ्यांचे मासिक यूपीआय उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे; त्यांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!