Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीयुरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या देशांचा समावेश आहे.सन २०२६-२७ साठी गडचिरोली जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे.त्यात एक महिला,एक केंद्र व राज्य कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी व पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर मध्ये तीन शेतकरी आहेत.
  • शेतकरी निवडी पात्रतेचे निकष👇
अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा.शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे.(प्रपत्र-२).शेतकऱ्याचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत व शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण असावे.कमाल वयाची अट नाही.परंतु शेतकरी  शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र(किमान एम.बी.बी.एस.डॉक्टरचे)सादर करावे.कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे.या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग १०-१२ दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र बांधनकारक राहील.शेतकरी वैध पारपत्रधारक(पासपोर्ट)असावा पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी.अर्ज सादर करतेवेळी परपत्राची वैद्य मुदत किमान एक वर्ष असावी.शेतकरी शासकीय, निमशासकीय,सहकारी,खाजगी संस्थेत नोकरीस नसावा.तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,वकील,सीए (चार्टड अकाउंटंट),अभियंता,कंत्राटदार इ.नसावा. तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे.प्रपत्र-२(याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी खातरजमा करावी.)शेतकरी यापूर्वी शासकीय,(केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत,कृषी विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा.तसे त्याने स्वयघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-२)शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील.
  • अनुदानाचा तपशील👇
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त २ लाख(दोन लाख रुपयांपर्यंत)यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी मार्गदर्शन सूचना आणि विहित नमुन्यातील अर्ज तातडीने तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन संपूर्ण भरलेला अर्ज १० ऑगष्ट २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!