Monday, June 29, 2026
Homeनागपूरमोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. - सायबर चोरट्यांनी ९...

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी नागपूरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलाश बद्रीप्रसाद अग्रवाल वय ६४ वर्षे हे नागपूरच्या इतवारी परिसरात ‘गगन ॲग्रो इंडस्ट्री’ या नावाने धान्य खरेदी-विक्रीचा घाऊक व्यवसाय करतात.त्यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्याशी मोबाईल क्रमांक लिंक असून ते नियमितपणे बँकेच्या अधिकृत मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करत होते.ते दुकानात असतांना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. मोबाईल स्क्रीनवर ‘इंडसइंड बँकिंग’ असे नाव आणि बँकेचा लोगो होता. समोरच्या व्यक्तीने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत,सध्या वापरत असलेले मोबाईल बैंकिंग ॲप कालबाह्य झाले.असून नवीन ॲप डाउनलोड करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर अग्रवाल यांच्या व्हॉट्सॲपवर एक एपीके लिंक पाठविण्यात आली.त्यात अधिकृत बँक ॲपची लिंक असल्याचा समज करून कैलाश अग्रवाल यांनी ती डाउनलोड केली आणि ॲपमध्ये खाते क्रमांक आयएफएससी कोड,डेबिट कार्ड क्रमांक,एक्सपायरी डेट,सीव्हीव्ही आणि एटीएम पिन यांसारखी संवेदनशील माहिती भरल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर व्यवहारांचे संदेश येण्यास सुरुवात झाली.सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या सहा व्यवहारांद्वारे ९ लाख ९७ हजार ७८० रुपये वळविले.अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी नगरपरिषद शाळेत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "माझा गाव...माझी शाळा...माझी जबाबदारी" या संकल्पनेतून देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,सोमवार २९ जून रोजी सकाळच्या सुमारास...

महाकर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग; पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिळणार कर्जमुक्तीचा लाभ.. – पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते.परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे.कधी अवकाळी पाऊस,कधी तीव्र दुष्काळ,तर...

अखेर दोघांचा बळी घेणारी नरभक्षक वाघिण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात दोघांचा बळी घेणारी व दोघांना जखमी करणारी टी-२७ नरभक्षक वाघीण जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे.आज,रविवार २८...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात आज रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!