- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या अधिपत्याखालील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ६४ वी सुब्रोतो मुखर्जी कप जिल्हास्तर फुटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मुलचेरा,ता.मुलचेरा,जि. गडचिरोली येथे येत्या ८ जुलै व ९ जुलै २०२५ रोजी पार पडणार आहे.सर्व संघांनी ८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.या स्पर्धेत सबज्युनिअर १५ वर्षाखालील मुलांची व ज्युनिअर १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटांची सामने होणार आहेत.यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी वयोगटानुसार अटी पुढीलप्रमाणे आहेत.
सबज्युनिअर १५ वर्षाखालील मुलांसाठी-१ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
ज्युनिअर १७ वर्षाखालील मुले व मुलींसाठी-१ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असणे आवश्यक आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व संघांनी www.subrotocup.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या संघांनाच स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली जाईल.तसेच सर्व संघांनी स्पर्धेतील सहभागाकरिता ४ जुलै २०२५ पर्यंत ऑफलाईन प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सादर करणे अनिवार्य आहे.
- प्रत्येक खेळाडूकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक👇
जन्मदाखला,आधार कार्ड,खेळाडू ओळखपत्र,पासपोर्ट
१५ वर्षाखालील खेळाडूंसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून,कोणताही खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ स्पर्धेतून बाद केला जाईल.
प्रवेश अर्जामध्ये खेळाडूचे संपूर्ण नाव,जन्मतारीख, वर्ग,आधार क्रमांक,शाळेचे नाव व पत्ता,यु-डायस क्रमांक,रजिस्टर नंबर,मोबाईल क्रमांक ही माहिती समाविष्ट असावी.प्रत्येक संघाने प्रवेशिकेची एक प्रत स्पर्धास्थळी सोबत आणणे आवश्यक आहे.सर्व संघांनी वेळेवर स्पर्धास्थळी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (मो. 9503331133) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
- Advertisement -

