Monday, April 27, 2026
Homeकुरखेडामहिला पोलिस पाटलांना शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या पिता-पुत्रांची कारागृहात रवानगी…-कुरखेडा तालुक्यातील सोन्सरी...

महिला पोलिस पाटलांना शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या पिता-पुत्रांची कारागृहात रवानगी…-कुरखेडा तालुक्यातील सोन्सरी येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा (गडचिरोली) :- कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील महिला पोलिस पाटलांना शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या पिता – पुत्रांची काल,१६ मे रोजी चंद्रपूर कारागृहात रवानगी झाली.

सुमित्रा वालदे या सोनसरी गावच्या पोलिस पाटील आहेत.महिनाभरापूर्वी गावात एका व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला होता.पोलिस पाटील म्हणून सुमित्रा वालदे यांनी याची माहिती कुरखेडा पोलिसांना कळवली होती.त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली होती. दरम्यान,घटनास्थळाकडे जाताना त्याच दिवशी पोलिस पाटील सुमित्रा वालदे व कोतवाल फिरोज हलामी यांना अडवून हुज्जत घालत गावातील पिता-पुत्राने मारहाण केली होती.पोलिसांना माहिती का दिली,असा जाबही त्यांनी विचारला होता.पोलिस पाटील सुमित्रा वादले यांच्या तक्रारीवरुन शासकीय कामात अडथळा,मारहाण,अश्लील शिवीगाळ प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदविला होता.तब्बल महिनाभराने कुरखेडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.दिलीप बाबूराव मडावी वय ४१ वर्षे व महेश दिलीप मडावी वय २२ वर्षे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना १६ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत केली.त्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा कारागृहात पाठवले,असे सहायक निरीक्षक दिनेश गावंडे यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!