- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-न्यायवैद्यकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका २७ वर्षीय मेयो रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरसोबत आपत्तीजनक व्यवहार करणाऱ्या न्यायवैद्यक विभागाचे (फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट)विभागप्रमुख डॉ.मकरंद सूर्यकांत व्यवहारे याच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(मेयो)२७ वर्षीय महिला निवासी डॉक्टर
न्यायवैद्यकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. डॉक्टर महिला फेब्रुवारीपासून फॉरेन्सिक सायन्स विभागात कार्यरत आहे.अश्यातच न्यायवैद्यक विभागाचे विभागप्रमुख डॉ.मकरंद व्यवहारे तिला सुरुवातीपासून त्रास देत होते.एकटीला वारंवार आपल्या कक्षात बोलावून तिच्यासोबत आपत्तीजनक व्यवहार करीत होते. सुरुवातीला महिला डॉक्टरने त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले; मात्र त्रास वाढल्याने या बाबींना विरोध केला.त्यामुळे डॉ.व्यवहारे याने तिला धमकी दिली.महिला डॉक्टरने याबाबत रुग्णालयातील वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही.अखेर महिला निवासी डॉक्टरने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या घटनेमुळे निवासी डॉक्टरांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत होता.निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने डॉ.व्यवहारेंवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करून मुख्यमंत्री तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर शुक्रवारी तहसील पोलिसांनी डॉ.मकरंद व्यवहारेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे,मेयो रुग्णालय व्यतिरिक्त यापूर्वी मेडिकलमध्ये असतांना डॉ.व्यवहारे विरुद्ध निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून अजनी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- Advertisement -

