Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोलीमहिन्याला १८ हजार ५०० रुपये वेतन; फील्ड ऑफिसर पदांसाठी भरती.. - मुलाखतीद्वारे...

महिन्याला १८ हजार ५०० रुपये वेतन; फील्ड ऑफिसर पदांसाठी भरती.. – मुलाखतीद्वारे होणार निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नोकरी देणारे व नोकरी शोधणारे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरचा रोजगार मेळावा येत्या,शुक्रवार १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सामाजिक न्याय भवन,जिल्हा समाजकल्याण कार्यालय,एलआयसी चौकाजवळ,गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.या रोजगार मेळाव्यात फायनान्स क्षेत्रातील नामांकित एल अँड टी फायनान्स ही खाजगी कंपनी सहभागी होणार असून फील्ड ऑफिसर पदासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.सदर पदांसाठी २० ते ३० वयोगटातील पदवीधर बेरोजगार पुरुष उमेदवार पात्र राहणार आहेत.निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना १८ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येणार आहे.रोजगार मेळाव्यात उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहतांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष सहभागी व्हावे.जास्तीत-जास्त बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!