Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीमहसूल कर्मचाऱ्यांनी पुकारला संप; नागरिकांची कामे खोळंबली…

महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारला संप; नागरिकांची कामे खोळंबली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-सध्या शाळा महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे.तर राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.त्यामुळे विविध प्रमाणपत्रांसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. परंतु,विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवार,१५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. परिणामी,महसुली व्यवस्था ठप्प पडली असून त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला.विविध प्रमाणपत्रे व दाखल्यांसाठी ससेहोलपट सुरू आहे.नागरिकांची राज्यभरात महसूल कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यासोबतच लाडकी बहीणसाठी आकृतिबंद तयार करण्यात यावा;  यासह विविध प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी १० जुलैपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून काम करण्यात आले.दुसऱ्या दिवशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नारे निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.शुक्रवारला लेखनीबंद आंदोलन केली.याचा फटका तहसील कार्यालय व महसूलशी संबंधित कार्यालयामध्ये कामासाठी येणाऱ्या जनसामान्यांना बसला.तर १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे.त्यात सर्व महत्त्वाचे कर्मचारी सहभागी झाल्यामुळे जात प्रमाणपत्र,रहिवाशी दाखले,उत्पन्न दाखले देण्याचे काम ठप्प होते.केवळ याचे प्रस्ताव ऑनलाईन सादर होत असले तरी महसूल सहायकांनी ते प्रस्ताव पुढे नायब तहसीलदारांच्या डेक्सवर पाठविले नाही.त्यामुळे प्रमाणपत्रे व दाखलेच निघाले नाही.त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला.गौण खनिजाचे उत्पन्न मिळणार नाही.त्यामुळे गौण खनिजाचा महसूल बुडाला.संजय गांधी,इंदिरा गांधी,श्रावणबाळ निराधार योजनेचे कामे खोळंबली आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!