Friday, June 26, 2026
Homeमुंबईप्रधानमंत्री पीकविमा भरण्यास मुदतवाढ…

प्रधानमंत्री पीकविमा भरण्यास मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती.मात्र,राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित राहिले होते.त्यामुळे त्यांना संधी मिळावी यासाठी पिकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी; अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.त्यांच्या मागणीला यश आले आहे.त्यांच्या मागणीनंतर ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (सेतू) च्या केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.या पिकविम्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज आणि लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाल्याचे समोर आले.त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहत होते.या पार्श्वभूमीवर पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता.

मंत्री धनंजय मुंडे या मुदतवाढीसाठी स्वतः पाठपुरावा करीत होते.त्यानुसार आज,सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.केंद्र सरकारने विमा भरण्यासाठी मुदत वाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!