Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीमनोज ढोरे यांच्यासाठी खुलणार जिल्हा परिषदेचा पिटारा... - वरिष्ठांकडून कार्याची दखल...

मनोज ढोरे यांच्यासाठी खुलणार जिल्हा परिषदेचा पिटारा… – वरिष्ठांकडून कार्याची दखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पुढील काही दिवसांत महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदार पदासाठी सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात रस्सीखेच प्रकार सुरू असल्याने जो-तो सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. गृहभेटी देणे,आंदोलने उभारणे,आर्थिक मदत करणे व इतर अशा नानाविध प्रकारचे कार्ये अनेकजण करतांना आढळून येत आहेत. मात्र,आमदारकीची तिकीट कुणाला मिळणार व त्याचा खरा दावेदार ठरणार कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर खंदे समर्थक महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांचे कार्य बघता वरिष्ठांकडून कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचा जणूकाही पिटाराच खुलणार असल्याची चर्चा जनता-जनार्दनात रंगू लागली आहे.
मनोज ढोरे हे नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाश झोतात येत असतात.काँग्रेस पक्षातील सक्रिय नेता म्हणून त्यांची ओळख आहे.ऐकून घेण्याची क्षमता, सृजनशीलता,शांत स्वभाव,मोकळेपणा,दिल खुलास गप्पा-गोष्टी,आपलेसे करून घेणे व इतर गुण अंगी असलेले मनोज ढोरे हे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद क्षेत्रात नेहमी अनेक सामाजिक कार्य करतांना दिसून येतात.गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करणे,बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे, वाढदिवस दिनी रुग्णांना फळे वाटप,गरजूंना आर्थिक मदत, नागरिकांच्या समस्या सोडविणे,आंदोलन,निवेदने देऊन मागण्यांची पूर्तता करणे व इतर अशी अनेक कार्ये करून महत्वाची भूमिका त्यांच्याकडून बजावली जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी नसतांना युवकांचे प्रश्न मार्गी लावत जिल्हा परिषद क्षेत्राच्या कुरुड गावामध्ये विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज वाचनालयाची इमारत मंजूर करून आणीत इमारत बांधकाम उभारण्यात आले आहे.गावातील शेकडो विद्यार्थ्यांना वाचनालय इमारतीचा उपयोग होणार असल्याने गावातील युवक-युवतींनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांची निकड लक्षात घेता कलवट बांधकाम करून एकप्रकारे शेतकरी बांधवांना दिलासा देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.युवकांचे विविध उपक्रम तसेच जनतेच्या विविध समस्यांची दखल मार्गी लावण्याचा त्यांचा मानस असल्याचे दिसून येत आहे.कित्येकदा सार्वजनिक उपक्रमे राबवून सर्वसामान्य नागरिकांसह पक्षातील वरिष्ठ,सार्वजनिक मंडळे व गोर-गरीब लोकांची मने ढोरे यांनी जिंकली आहेत.त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचा  पिटारा खुलणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!