Thursday, July 9, 2026
Homeगडचिरोलीमका पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात १३ हजार १५५...

मका पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात १३ हजार १५५ हेक्टर पेरणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मका पिकाच्या पेरणी क्षेत्रात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत असून,रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र तब्बल १३ हजार १५५ हेक्टरवर पोहोचल्याचा खुलासा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी केला आहे.जिल्ह्यातील मका पिकाच्या क्षेत्रासंदर्भात काही माध्यमांमध्ये अपूर्ण माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वास्तव परिस्थिती स्पष्ट केली आहे.संबंधित आकडेवारीत नमूद केलेले २७३ हेक्टर हे केवळ उन्हाळी हंगाम २०२५-२६ मधील क्षेत्र असून,गडचिरोली जिल्ह्यात मका पिकाची प्रमुख पेरणी रब्बी हंगामात केली जाते,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार,जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र ४ हजार ८४ हेक्टर इतके आहे.मात्र, रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये हे क्षेत्र ९ हजार ५० हेक्टर होते,तर चालू रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये ते वाढून १३ हजार १५५ हेक्टर झाले आहे.म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ४ हजार १०५ हेक्टरची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.सध्याचे पेरणी क्षेत्र हे सरासरीच्या तुलनेत तब्बल ३२२ टक्के असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.तसेच खरीप,रब्बी आणि उन्हाळी हंगाम २०२५-२६ या तिन्ही हंगामांतील मका पिकाचे एकत्रित पेरणी क्षेत्र १४ हजार ५८ हेक्टर इतके असल्याची माहिती देण्यात आली आहे.यावरून जिल्ह्यात मका पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.
मका पीक प्रधान मंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही कृषी विभाग प्रयत्नशील आहे.या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या महसूल मंडळात किंवा तालुक्यात सलग तीन वर्षे किमान ३ हजार हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने मका पिकाचा क्षेत्रविस्तार वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.एकूणच,जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ ही कृषी क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक ठरत आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही ही बाब महत्त्वाची ठरत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!