- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून आज,बुधवार ३० एप्रिलला अक्षयतृतीया उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला.या शुभ दिवशी विवाह विधी मोठ्या प्रमाणात होतात.त्यामुळे कुठेही बालविवाह होऊ नयेत म्हणून प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत होती.अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पार पडणाऱ्या बालविवाहाच्या घटनांना रोखण्यासाठी प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग सज्ज असतांनाच नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील डोंगरगाव व कन्हान येथील बालविवाह थांबविण्यात आज,बुधवारी जिल्हा बाल संरक्षण पथकास यश आले आहे.
महत्वाचे म्हणजे,डोंगरगाव येथे १५ वर्षीय मुलीचा विवाह सोहळा पार पडणार होता.त्यासाठी मंडप सजला,मुलीला हळदह लावण्यात आली.पाहुणेही आले आणि स्वयंपाकही शिजला होता.तितक्यातच जिल्हा बाल संरक्षण पथकाने धाड टाकली व होणारा बालविवाह थांबविण्यात आला.दुसऱ्या घटनेत कन्हान येथील १७ वर्षीय मुलीचा हळदीचा कार्यक्रम आटोपला होता.सर्व सोपस्कार पार पडणार तितक्यातच पथकाने एंट्री मारून विवाह थांबविला.दोन्ही मुलींना घेऊन बाल संरक्षण पथकाद्वारे समुपदेशन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.सदरची कारवाई जिल्हा महिला बालविकास अधिकारी रणजीत कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण,जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसन्नजीत गायकवाड आणि बाल संरक्षण अधिकारी साधना हटवार यांनी केली.
- Advertisement -

