Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरभीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू..!

भीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन तरुण मामे-आते बहिणींचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगावनजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर घडली.अलिशा अनिकेत मेहर २६ वर्षे,रा.भुगाव, ता.कामठी,जि.नागपूर आणि तिची मामे बहीण मोनाली दिनेश्वर घाटोळे वय २७ वर्षे,रा.तायगाव खैरी,ता.सौसर, जि.पांढुरना,मध्यप्रदेश असे अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे असून त्या दोघी काल शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एमएच ४० बीएम २९५५ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा गाडीने भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या.अश्यातच महालगावजवळील नाग नदीच्या पुलावर मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दोघीही गंभीर जखमी झाल्या.या अपघातात अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला.तर मोनाली घाटोळे ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्यांनी प्राण सोडला. अलिशा या मूळच्या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी असून सात महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.तर मोनाली हिचा येत्या,२६ फेब्रुवारी २०२६ ला विवाह निश्चित झाला होता.लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतांनाच काळाने झडप घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!