Thursday, July 9, 2026
Homeदेसाईगंजभाऊ महिन्याचे पैसे देत आहे; तरीही पकडले.. - अधिकारी म्हणाला "पैसे देत...

भाऊ महिन्याचे पैसे देत आहे; तरीही पकडले.. – अधिकारी म्हणाला “पैसे देत आहे,म्हणजे विकत घेतला आहे कां”..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- ‘भाऊ जेल मधुन केव्हा आला गां?’अशी विचारणा एका अवैध तंबाखू विक्रेत्याला केली असता,त्याने रागाने एकटक पाहून सर्व सत्यानाश होत आहे.एवून-जाऊन मलाच पकडतात.सर्वांना महिन्याचे पैसे देत आहे; तरीही पकडले जाते.तंबाखू विक्रेत्याने सांगितले की,ज्याला पैसे देतो त्याला म्हणालो,असे काऊन.तर अधिकारी म्हणाला “पैसे देत आहे,म्हणजे विकत घेतला आहे कां? तू खुलेआम धंदा करतो आमची काही इज्जत आहे की नाही.त्या ठिकाणी पत्रकार,पोलीस व लोकप्रतिनिधी असतांनाही धरला बोजा-बीस्तर अन् चालला विक्री करायला; अशी आपबिती एका अवैध तंबाखू विक्रेत्याने कथन केली.
देसाईगंज शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध तंबाखू विक्री केली जातेय,पण होलसेल विक्रेत्यांना न पकडता चिल्लर खुर्दे वाल्यांना टार्गेट केले जाते. एखाद्याकडून जो पर्यंत महिना ठरत नाही,तोपर्यंत धरपकड अन् महिना सुरू होताच ‘जा जीले अपणी लाईफ’ ‘आम्ही खुश तर तू खुश’ आम्हीच खुश राहणार नाही,तर तू कसा काय खुश राहू शकतो,अशी डायलॉग झोडली जाते.त्यामुळेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावली आहेत.केवळ देसाईगंज शहर वा तालुक्यातच नाही,तर सर्वत्र हीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.एखादा तंबाखू विक्रेता पकडल्यानंतर त्यातील मोठी साखळी कधी सापडली काय? ज्या होलसेल ठिकाणाहून तंबाखूची खरेदी केली जाते,अश्या ठिकाणी कधी धाड पडली काय?सर्व जागेवरच सेटलमेंट होत असल्याने कोण अंगाला हळद लावून घेणार?ही सांगण्याची गरज नाही,पण त्या अधिकाऱ्याचेही म्हणणे बरोबर आहे; “पैसे देत आहे, म्हणजे विकत घेतला आहे कां”..तू एकटाच कमाई करशील अन् आम्ही..भांडी घासायची कां?विशेष म्हणजे, एखादा कर्मचारी महिण्याकाठी पगार घेतो आणि त्याच्या आयुष्याची सर्व सेवा ही लोकसेवेत पणाला लावतो. शेवटच्या क्षणी एक घर बांधकाम,एक चारचाकी वाहन आणि मुलांचे लग्न करून ठणठण गोपाला होऊन बसतो. मात्र,अवैध धंदे करून अफाट मोहमाया गोळा करणाऱ्यांची व त्यांच्याकडून वसुली करणाऱ्यांची किमया ही न्यारीच म्हणावी लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!