Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबोलेरो आणि खासगी बसचा अपघात; तब्बल १० जणांचा मृत्यू तर १९...

बोलेरो आणि खासगी बसचा अपघात; तब्बल १० जणांचा मृत्यू तर १९ जण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-प्रयागराजच्या महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी जाणाऱ्या बोलेरो वाहनाची खासगी बसला सामोरा-समोर धडक होऊन तब्बल १० जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री घडली.सदरचा अपघात प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील मेजा परिसरामध्ये झाला.खासगी बस महाकुंभवरून भाविकांना घेऊन मिर्झापूरकडे येत होती.ही धडक इतकी भीषण होती की पोलिसांना मृतदेह बाहेर काढतांना गॅस कटरची मदत घ्यावी लागली.अपघात रात्री २ च्या सुमारास घडला.अनेकांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा पुढचा भाग तुटला.भाविक रस्त्यावर फेकले गेले.अनेक मृतदेहांचे हात तुटले होते आणि काहींचे डोके फुटले होते. बोलेरोमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी ३ तास लागले.बॅगेत सापडलेल्या आधार कार्डवरून दोन मृतदेहांची ओळख पटली.ईश्वरी प्रसाद जयस्वाल आणि सोमनाथ दरिन अशी त्यांची नावे आहेत,ते छत्तीसगडमधील जमनीपाली कोरबा येथील रहिवासी आहेत.उर्वरित लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व भाविक महाकुंभात स्नान करण्यासाठी कोरबाहून प्रयागराजला येत असल्याचे सांगण्यात येत आहे.तर बस भाविकांना घेऊन मिर्झापूरकडे जात होती.मेजा पोलीस स्टेशन परिसरातील मनुका पुरा पेट्रोल पंपासमोर बोलेरो आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली.दरम्यान,बोलेरो चालकाला डुलकी आल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!