उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील बियाणे,खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी,कंपनी प्रतिनिधी,बियाणे,खते व किटकनाशके विक्रेते व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी संबंधात सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक- ८२७५६९०१६९ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा; तसेच आपल्या तक्रारी किंवा अडचणी dsaogad15@gmail.com / adozpgad@gmail.com या इमेलवर पाठविण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी प्रदीप तुमसरे यांनी केले आहे.
बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये; याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे. तसेच युरिया खत ज्यादा दराने विक्री केल्याचे व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिंकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा मोहीम अधिकारी,कृषि विभाग,आनंद पाल यांनी कळविले आहे.
प्रदीप तुमसरे,कृषि विकास अधिकारी,जि.प. गडचिरोली👇
जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर प्रत्येकी १ असे जिल्ह्यात एकूण १३ भरारी पथके स्थापन केलेले आहेत; बोगस बियाणे,खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द करण्यात येईल व कायदेशीर कार्यवाही केली जाईल,यासाबंधित कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे.

