Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीबीएचएमएस डॉक्टरांमुळे लोकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करणारे विधान चुकीचे.. -डॉ.श्रीकांत...

बीएचएमएस डॉक्टरांमुळे लोकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करणारे विधान चुकीचे.. -डॉ.श्रीकांत बनसोड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बीएचएमएस,सीसीएमपी पास डॉक्टरांमुळे लोकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होतो,असे विधान करणे अतिशय चुकीचे, दिशाभूल करणारे व होमिओपॅथी शास्त्राचा अपमान करणारे आहे.त्यामुळे,सीसीएमपी(Certificate Course in Modern Pharmacology)
कोर्सवर टीका करण्याआधी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची स्थिती,बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण,सेवा आणि रुग्णांची गरज यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.भ्रामक विधान करून रुग्णांचे नुकसान करणे थांबवावे,कारण सर्वसामान्य जनतेला सेवा हवी असते,वाद नव्हे.असे बनसोड हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रीकांत बनसोड यांनी भारतीय वैद्यकीय संघटनांकडून(Indian Medical Association) होमिओपॅथिक डॉक्टरांची सातत्याने बदनामी केली जात प्रकरणी खडेबोल सुनावले आहे.
डॉ.बनसोड पुढे म्हणाले की,सीसीएमपी(Certificate Course in Modern Pharmacology) हा अभ्यासक्रम कोणत्याही अनधिकृत पद्धतीने सुरु करण्यात आलेला नसून तो महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार सुरु करण्यात आलेला आहे.यामध्ये फक्त BHMS/BAMS डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील मूलभूत औषधोपचार शिकवले जातात.जेणेकरून ते ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये आवश्यक प्राथमिक वैद्यकीय सेवा देऊ शकतील.
  • ग्रामीण भागातील वास्तव👇
महाराष्ट्रातील लाखो गावांमध्ये आजही MBBS डॉक्टर उपलब्ध नाहीत.अशा ठिकाणी BHMS डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत. CCMP कोर्सने त्यांना सुरक्षित आणि वैधानिक पद्धतीने उपचार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून रुग्णाच्या जीवाला उलट फायदा होतो, धोका नव्हे.
  • शिक्षणाची व्यापकता👇
BHMS कोर्समध्ये अ‍ॅनाटॉमी,फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी,मेडिसिन,सर्जरी,फार्माकॉलॉजी यांसारखे MBBS प्रमाणेच विषय शिकवले जातात.त्यामुळे CCMP हा कोणताही शॉर्टकट नसून,विद्यमान ज्ञानावर आधारित एक पूरक प्रशिक्षण आहे.
  • कोर्स मान्यता आणि गरज👇
CCMP हा कोर्स IMA(Indian Medical Association)किंवा अन्य खाजगी संघटनेच्या दबावामुळे नव्हे,तर आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या गरजांमुळे शासनाने स्वीकारलेला निर्णय आहे.या कोर्समुळे सरकारी यंत्रणेलाच मोठा आधार मिळतो,जे डॉक्टरांच्या भरतीत स्पष्ट दिसून येते.
  •  रुग्णसेवा हेच प्रमुख ध्येय👇
BHMS डॉक्टर हे गेली अनेक वर्षे अत्यंत निष्ठेने ग्रामीण भागात सेवा देत आले आहेत.हजारो रुग्ण वाचवले गेले आहेत.CCMP कोर्स हे त्यांच्या अनुभवाला वैधता देतो आणि सेवा अधिक प्रभावी बनवतो.
जर आयएमए (Indian Medical Association)  सारख्या संघटनांकडून सातत्याने होमिओपॅथिक डॉक्टरांची बदनामी केली जात असेल,तर यापुढे अशा अपमानास्पद आणि चुकीच्या विधानांवर कायदेशीर पातळीवर कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा डॉक्टर श्रीकांत बनसोड यांनी दिला आहे.
डॉ.बनसोड यांनी असेही सांगितले की,CCMP अभ्यासक्रम हा महाराष्ट्र सरकारने मान्य केलेला असून,हा कोर्स केवळ ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.यामधून हजारो गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले असून,अनेकांचे प्राण वाचले आहेत.यापुढे जर IMA किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची तथ्यहीन,अपमानकारक विधाने करून होमिओपॅथिक डॉक्टरांची प्रतिमा मलिन केली,तर त्यांच्यावर बदनामीचे गुन्हेगारी खटले दाखल करण्यात येतील. सर्व डॉक्टर हे रुग्णसेवेसाठीच कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यासपीठांवर परस्पर सन्मान,सहकार्य आणि संयम राखणे हीच काळाची गरज असल्याचे मत डॉ.श्रीकांत बनसोड यांनी व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!