Friday, September 4, 2026
Homeगोंदियानाग साप पकडायला गेला अन् जीव गमावून बसला; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू..

नाग साप पकडायला गेला अन् जीव गमावून बसला; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-थंडीच्या दिवसांत सरपटणारे प्राणी,विशेष करून विषारी व बिन विषारी प्रजातींचे साप बिळातून बाहेर निघून गाव शिवारात,रस्त्यांवर तसेच केव्हा- केव्हा तर घरांमध्ये आढळून येतात.अश्याच प्रकारे कोब्रा नाग साप गावातील एका नागरिकाच्या घरी निघाला.साप निघाल्याची माहिती मिळताच एका ३० वर्षीय तरुणाने गंमत म्हणून नाग साप पकडला.साप पकडला तर खरी,पण हातात धरून असतांनाच सापाने हाताच्या बोटाला दंश केला.यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे काल,गुरुवार १० जुलै रोजी घडली असून घटनेचा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने सदरची घटना आज,शुक्रवारी उघडकीस आली.लक्की बागडे वय ३० वर्षे असे सर्प दंशाने मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा गावातील कुंभरे यांच्या घरी काल गुरुवारी नाग साप निघाला.साप निघाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच लक्की बागडे हा कुंभरे यांच्या घरी साप पकडण्यासाठी गेला.मात्र,लक्की बागडे याला साप पकडण्याचा कुठलाही अनुभव नव्हता.अश्यातच त्याने इतर सर्प मित्र साप पकडतात म्हणून त्यानेही  गंमत म्हणून नाग साप पकडला.साप हातात घेताच नाग सापाने लक्कीच्या हाताच्या अंगठ्याला  दंश केला.सापाने दंश केल्याने त्याला तातडीने भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.तिथे उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाला.एका गंमतीने तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!