Tuesday, August 25, 2026
Homeदेसाईगंजबाव्वारे....! कोंढाळा गावातील 'जल जीवन मिशन' योजनेचे करोडो रुपयांचे काम निकृष्ट दर्जाचे…..'एक...

बाव्वारे….! कोंढाळा गावातील ‘जल जीवन मिशन’ योजनेचे करोडो रुपयांचे काम निकृष्ट दर्जाचे…..’एक ना धड भाराभर चिंध्या’; गावातील ग्रामस्थांनी केली तक्रार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(कोंढाळा) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायत येथील ‘जल जीवन मिशन’ योजनेचे करोडो रुपयांचे काम ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे केले जात आहे.अशातच सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांना तक्रार दाखल केली आहे.

गावातील नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,कोंढाळा ग्रामपंचायत येथील ‘जल जीवन मिशन’ योजनेचे काम गेली एक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे.सुरुवातीला जलकुंभ बांधकाम,विहीर बांधकाम,पाईप लाईन जोडणी,घरगुती नळ जोडणी व इतर कामे पूर्ण करून ‘जल जीवन मिशन’ योजनेचे काम पूर्णत्वास आणले जाणार आहे.मात्र हल्ली सुरू असलेल्या पाईप लाईन जोडणी व घरगुती नळ जोडणीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.आम्ही गावातील नागरिक गावामध्ये सुरू असलेल्या पाईप लाईन जोडणी व घरगुती नळ जोडणीच्या कामावर प्रत्यक्ष पाहणी केली असता; पाईप लाईन वरती दगड व मुरूमाळी दगड टाकून पाईप बुजविले जात असल्याने एखादे वेळेस रहदारीच्या रस्त्यावरून जड वाहन गेल्यास पाईप लाईन फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशातच पाईप लाईन फुटल्यास खोदकाम करावयास गेल्यास पाईप कुठ पर्यंत आहे; हे कळणारच नाही.कारण की,पाईपच्या खाली व पाईपच्या वर रेतीच टाकली जात नाही.ग्रामपंचायत पदाधिकारी,कंत्राटदार व अभियंता उडवा-उडविची उत्तरे देऊन हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंदाजपत्रकात तरतूद नाही; असे सर्वांकडून सांगितले जात आहे.मात्र अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक असतांनाही जाणून-बुजून सदर काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.तसेच पाईप लाईनचे पाईप व घरगुती नळ जोडणीचे पाईप ही निकृष्ट दर्जाचे टाकले जात आहे.सदर सुरू असलेल्या कामावर कुणीही लक्ष घालीत नसल्याने ‘चलती का नाम गाडी’ असे केले जात आहे.ना कोणती समिती लक्ष घालीत,ना कोणते ग्रामपंचायत पदाधिकारी लक्ष घालीत; त्याचप्रमाणे घरगुती नळ जोडणीच्या कामात दुसऱ्या व्यक्तीचे नाव समोर करून एक ग्रामपंचायत पदाधिकारी काम करीत असल्याची चर्चा गावामध्ये सुरू असल्याने अशांवर कारवाई होणे आवश्यक आहे.अशातच ज्या ठिकाणी पाईप लाईन व घरगुती नळ जोडणी करण्याची आवश्यकता नसतांनाही मागील काही महिन्यांपूर्वी तसेच काही वर्षांपूर्वी बांधकाम केलेले सिमेंट-काँक्रिटचे रस्ते पाईप लाईनसाठी खोदकाम करण्यात आले आहे.तसेच अशी रस्ते पूर्णपणे खोलगट होऊन शासनाच्या लाखो रुपयांवर पाणी फेरले गेले असल्याने कोंढाळा ग्रामपंचायत येथील ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी; चौकशी समिती नेमतांना आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी; अशी मागणी गावातील सुजाण नागरिक नामदेव वसाके,विनोद राऊत,महेश दुपारे,आनंदराव दुपारे ,वासुदेव बुराडे,विकास मोहुर्ले, गणेश वसाके,अभिषेक बुराडे,सारंग राजगडे,भूषण राऊत,कार्तिक ठाकरे,महादेव ठाकरे,आशिष गावतुरे मंगेश वसाके,पवन खोब्रागडे व सचिन मोहुर्ले यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!