- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या इसमाच्या जळालेल्या चितेजवळ पूजेचे साहित्य,लिंबू,रंगीबेरंगी धागे,एका बाटलीत गोमूत्र, पाण्याची बॉटल तसेच पूजा करणाऱ्या व्यक्तीचे अंगावरील कपडे आणि बूट अस्ताव्यस्त पडलेले दृश्य पाहून कुटुंबीय तसेच नातेवाईकांची काहीकाळ भंबेरी उडाली.सदरची घटना कुही तालुक्याच्या साळवा गावात नुकतीच उघडकीस आली.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवार २४ ऑगस्ट रोजी साळवा गावातील एका ५० वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. निधन झाल्यानंतर कुटूंबीय,नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी मिळून स्थानिक स्मशानभूमीत अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.त्यानंतर,काल,मंगळवार २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कुटूंबीय तसेच नातेवाइक अस्थी(राख)संकलनासाठी स्मशानभूमीत गेले असता समोरील दृश्य बघताच थरकाप उडाला.चितेजवळच एका अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे दिसून आले.सदरची धक्कादायक माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि विविध चर्चांना उधाण आले.या प्रकाराची माहिती मिळताच कुही पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी भयभीत न होता अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये,असे स्पष्ट केले.तर कुही पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी कुटुंबीयांना तक्रार देण्यास सांगितले.मात्र,काही जाणकारांच्या मते, अघोरी पूजेच्या कथित पद्धतीनुसार अशी पूजा करतांना अंगावर एकही वस्त्र ठेवले जात नाही.तसेच,ही पूजा सुरू असतांना कुणाचा अडथळा आल्यास पूजा अपूर्ण राहते.रात्रीच्या वेळी ही पूजा सुरू असतांना कुणाची तरी चाहूल लागल्याने आपला भांडाफोड होऊ नये या भीतीने तो मांत्रिक स्वतःचे कपडे,बूट आणि पूजेचे सर्व साहित्य तिथेच सोडून उघड्या अंगाने पळून गेला असावा,असा कयास काही गावकऱ्यांनी व्यक्त केला.अश्यातच पूजा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे अंगावरील कपडे आणि बूट स्मशानभूमीत आढळून आल्याने नेमका तो व्यक्ती कोण?याचा तपास होणे गरजेचे आहे,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
- Advertisement -

