- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील करंचा गावात उघडकीस आली.लक्ष्मण सोमा आलाम वय ५५ वर्षे,रा.करंचा,ता.अहेरी,जि.गडचिरोली असे आरोपीचे नाव असून त्याचा उजवा हात शाबूत असल्याने त्याने चक्क उजव्या हातात कुऱ्हाड घेऊन क्रूरपणे खून केल्याचे समोर आले आहे.प्रकरणी मरपल्ली पोलिसांनी आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.महेश सत्यन्ना ओडिला वय २८ वर्षे,रा.कर्जी, ता.दायगाम,जि.कोमाराम भीम,तेलंगणा असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून महेश ओडिला व त्याचा मित्र राजेश चापिला हे दोघे गुरुवार १८ जून २०२६ रोजी तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील करंचा गावी आले होते.दरम्यान,येनकाबंडा गावात एका तेरवीचा कार्यक्रम झाल्यानंतर महेश ओडिला व त्याचा मित्र राजेश चापिला हे करंचा येथील लक्ष्मण आलाम याच्या घरी रात्री मुक्कामासाठी थांबले होते.रात्रीचे
जेवण करून तिघेही अंगणात स्वतंत्र खाटेवर झोपले होते.पण,आरोपी लक्ष्मण आलाम याच्या मनात पैश्याच्या रागाची काहीतरी वेगळीच खिचडी पकत असल्याने त्याने शुक्रवार १९ जूनच्या मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या महेश ओडिला याच्या डोक्यावर व गळ्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले.यातच महेशचा मृत्यू झाला.घटनेनंतर महेशसोबत असलेल्या राजेश चापिला याने तात्काळ मरपल्ली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जंगल परिसरात छपून बसलेल्या आरोपी लक्ष्मण आलाम यास अटक केली.प्रकरणाचा पुढील तपास मरपल्ली पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

