Sunday, August 30, 2026
Homeनागपूरबलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. - गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार,पीडितेचे नाव कोणत्याही सोशल मीडिया, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे.भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ६८ आणि पॉक्सो कायदा, २०१२ च्या कलम २३ नुसार पीडितेचे नाव उघड करणे गुन्हा आहे.बलात्कार पीडिता किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील कुणी नाव किंवा तिची ओळख उघड करत असेल,तर त्या व्यक्ती,संस्था किंवा सरकारला थेट न्यायालयातर्फे किंवा राष्ट्रीय महिला आयोगातर्फे कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते.या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.अश्यातच नागपुरातील एका बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक केल्यामुळे गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त,तसेच नागपूरच्या गिट्टीखदानचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय दिघे आदींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावून उद्या,मंगळवार २६ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.प्रकरणावर न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्यापुढे सुनावणी झाली.यासंदर्भात पीडित महिलेने याचिका दाखल केली आहे.पीडित महिला विधवा असून प्रॉपर्टी डिलर रवी सुनील अजित याने आर्थिक व भावनिक आधार देण्याचे आणि लग्न करण्याचे वचन देऊन बलात्कार केला.त्याने तो विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवली.तसेच,हे प्रकरण दडपण्यासाठी वाईट परिणाम भोगावे लागतील,अशी धमकी दिली,असा आरोप आहे.आरोपींविरोधात १७ मे २०२६ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर,
१९ मे ला रात्री ८ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी झालेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया देतांना स्पष्टीकरण दिले आहे.ती महिला आपल्या तक्रार मधील बयान देखील बदलवत असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली,तसेच काही यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्रतिनिधींना मुलाखती देऊन पीडित महिलेचे नाव व छायाचित्र सार्वजनिक केले,असा दावा याचिकेत करण्यात आला. तसेच,दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!