- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वंचित,शोषित,पीडितांच्या मदतीसाठी तात्काळ धावून जाणारे व अन्यायाविरुद्ध आंदोलने उभारून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रा.मुनिश्वर बोरकर यांची पुनश्च एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(RPI)गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य निवडणुक अधिकारी डॉ.गौतम गोसावी,मुंबई यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रा.बोरकर यांच्या निवडीमुळे पक्षाला बळकटी येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.बोरकर यांच्या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील संघटनास बळकटी येणार आहे.यापूर्वीही प्रा.मुनिश्वर बोरकर हे गडचिरोली जिल्ह्याच्या रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी होते.संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्यानेच त्यांची पुनश्च एकदा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणिस डॉ.राजेंद्र गवई,प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे,गडचिरोलीचे माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम तथा आरपिआय नेते गोपाल रायपुरे यांचेसह संपूर्ण जिल्हावासिय कार्यकर्त्यांना दिले आहे.
- Advertisement -

