Sunday, September 6, 2026
Homeब्रम्हपुरीप्रशासन सुस्त; रेती तस्कर मस्त..!- ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या...

प्रशासन सुस्त; रेती तस्कर मस्त..!- ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रह्मपुरी :- तालुक्यातअवैधरीत्या रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात असून काही गावातील नागरिक यावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करीत असता रेती तस्कर हमारी-तुमरी वर येत असल्याने रेती तस्करीवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध  तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

२७ फेब्रुवारी २०२३ ला पर्यावरण विभागाने शासन आदेश काढत रेतीघाट बंद केले.तरीसुद्धा तालुक्यातील अर्हेर नवरगाव,रणमोचन, खरकाडा, सोंन्द्री, बोढेगाव, बोळधा,हळदा,आवळगाव,चिखल- धोकळा,कोलारी,बेलगाव या नदीपात्रातून रेतीचा विनापरवाना अवैधरीत्या उपसा मोठ्या जोमाने सुरू आहे.मात्र,स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरातून दिवस-रात्र विनापरवाना रेतीची अवैधरीत्या तस्करी होत आहे.स्थानिक गावातील नागरिक रेतीतस्करांना विरोध करीत आहेत; पण वाळू तस्कर अरेरावीची भाषा करीत तक्रार केल्यास धमकी देतात.मात्र,यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

काही नागरिकांनी गुरुवारी अहेर नवरगाव नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परला अडवून विचारणा केली.त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वाळू परवाना नसल्याचे समोर येताच त्यांनी ११२ वर कॉल केला पण पोलिस प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल दोन तास त्या टिप्परला अडवून ठेवले होते; परंतु कोणतेच अधिकारी,कर्मचारी कारवाईसाठी धजावले नाहीत.

अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!