Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीप्रलंबित न्यायप्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी’ विशेष मोहीम..

प्रलंबित न्यायप्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी’ विशेष मोहीम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात प्रलंबित न्यायप्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी’ ही विशेष मोहीम १ जुलै २०२५ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.ही मोहीम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी व सलोखा प्रकल्प समितीच्या संकल्पनेतून साकारली गेली असून, सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात ही मोहीम राबविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष व्ही.आर. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेमुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीच्या माध्यमातून सामंजस्य निर्माण करून,दोन्ही पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मोहिमेंतर्गत विविध प्रकारची प्रलंबित प्रकरणे मध्यस्थीसाठी विचारात घेतली जात आहेत.त्यामध्ये वैवाहिक वाद,अपघात भरपाई प्रकरणे,कौटुंबिक हिंसाचार,धनादेश न भरणे,व्यावसायिक व सेवाविषयक वाद,तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, ग्राहक तक्रारी,कर्ज वसुली,जमिनीच्या मालकीचा व वाटपाचा वाद,घरमालक व भाडेकरू विवाद,जमीन संपादनासंबंधीचे व इतर नागरी प्रकरणांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे या मोहिमेत पक्षकारांच्या सोयीप्रमाणे मध्यस्थी प्रक्रिया ऑनलाईन,ऑफलाईन किंवा हायब्रिड स्वरूपात राबविण्यात येणार आहे.या प्रक्रियेत ४० तासांचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेले आणि पात्रता प्राप्त सर्व मध्यस्थी सहभागी होत आहेत.
ज्या नागरिकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांनी या मध्यस्थी प्रक्रियेचा लाभ घेऊन आपली प्रकरणे जलद मार्गी लावावीत,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!