Saturday, October 3, 2026
Homeनागपूरपोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली. ज्ञानेश्वर झोल असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
ज्ञानेश्वर झोल यांनी पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर झोल यांनी आज रविवारच्या मध्यरात्री बारा ते एक वाजाताच्या सुमारास आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्यासारख्या वरिष्ठ आणि जबाबदार व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे नागपूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.झोल यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले,हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर झोल यांनी आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!