Saturday, August 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ताजी असतांनाच आता हिंगोली जिल्हा पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)यांनी आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याने हिंगोली पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल विठ्ठलराव गंगलवाड वय ५० वर्षे ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.विशेष म्हणजे,घटनेवेळी गंगलवाड हे वर्दितच होते.आज शनिवारच्या सकाळी साडे आठच्या दरम्यान हिंगोली शहराच्या खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे रुळावर सदरचा प्रकार घडला.अमोल गंगलवाड हे पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत उभे होते.रेल्वे जवळ येताच त्यांनी अचानक धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली.या घटनेत
पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने तात्काळ हिंगोली रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली.त्यानंतर शहर पोलिसांना याविषयी कळवण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर,सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपककुमार मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.मृतक गंगलवाड हे दोन महिन्यांपूर्वीच परभणी येथून बदली होऊन हिंगोली जिल्हा पोलिस दलात रुजू झाले होते आणि आज त्यांनी जीवनयात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!