- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार भरमसाठ पगार (वेतन)असूनही अनेकांचे वरच्या कमाई शिवाय पोटच भरत नाही; असे वाटते.याला काहीजण अपवादही आहेत.त्यातच सुरुवातीला बाहेर राज्यातील वा बाहेर जिल्ह्यातील अनेकजण गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करायला घाबरत असतात.त्याचे कारण म्हणजे,नाही बाप्पा..! जिल्ह्यात नक्षलवादी आहेत,जंगल परिसर आहे व इतर अनेक कारणे पुढे करून नोकरी करायला नो..! म्हणतात. अशातच जिल्ह्यात नोकरी करून पदार्पण झाल्यास काहींचे आनंद गगनात मावेनासे होत असते व अनेकजण जिल्ह्यातून बाहेर ठिकाणी गेल्यास त्यांना गडचिरोली जिल्हा हा नेहमी स्मरणात राहतो.त्याचे कारणही तसेच आहे. ‘गडचिरोली जिल्हा अन् खादाळावर भिडला’ इथे साधन संपत्ती भरपूर आहे; त्यातच ओव्हर कमाई ही भरपूर होत असते.अशातच गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा नव्याने रुजू होताच अनेक अधिकाऱ्यांची उचलबांगडी करतांना दिसून येतात.जिल्हा खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १६२ कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थगिती दिली होती. जिल्हा खनिज निधीतून खनिज उत्खनन होत असलेल्या प्रभावित गावांमध्येच पायाभूत सुविधांची कामे करणे अनिवार्य होती.पण,या नियमांना सोयीस्कर बगल देत खनिज निधी बिगर प्रभावित गावांमध्ये वळविण्यात आला होता.सदरची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच १० मार्च रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे यांच्याकडील पदभार काढून त्यांना हटविण्यात आले होते व त्यांच्याकडील पदभार नागपूर येथील खनिकर्म अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.अशातच आता आणखी एका अधिकाऱ्याचा पैसे घेण्याचा नवा फंडा उघडकीस आला आहे.कामे मंजूर करण्यासाठी बायकोच्या खात्यात पैसे स्वीकारल्याचा आरोप करीत कंत्राटदारांनी काल,सोमवार २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे यासंदर्भातील बँक व्यवहाराचा तपशील सादर केला आहे.सदरचा कारनामा करणारे गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे असून त्यांनी त्यांच्या बायकोच्या बँक खात्यात पैसे स्वीकारल्याची तक्रार सोमवारी १७ मार्च रोजी मयूर गव्हारे,पवन भांडेकर,गणेश भांडेकर,नेताजी खोडवे,भूषण सेकुरतीवार या कंत्राटदारांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडे पुरावे मागितले असता काल,सोमवारी २४ मार्चला कंत्राटदारांनी बँक व्यवहाराचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला, त्यात २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी भवानी कॉन्ट्रोवेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या खात्यातून पाचखेडे यांच्या बायकोच्या खात्यात दीड लाख तर २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी संतोष बंडावार यांच्या खात्यातून १ लाख ८० हजारांची रक्कम जमा केली आहे.सदर कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर पुरावे सादर केल्याने आता काय कारवाई केली जाते,याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.काही कार्यालयांमध्ये कामे वाटप करतांना व कामे झाल्यानंतर ५ पासून ते २५ टक्क्या पर्यंत सर्वांची टक्केवारी ठरलेली असते.त्यातच काही ठिकाणी सरळ-सरळ फिफ्टी-फिफ्टीचा फंडा वापरून मोठ्या प्रमाणावर खिसे गरम केले जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात नेहमी सुरू असतात.त्यामुळे अश्यांवर लगाम कसने आवश्यकच झाले आहे.
- Advertisement -

