Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरपेपरच्या अभ्यासाचा घेतला टेन्शन; विद्यार्थ्याने केली आत्महत्या

पेपरच्या अभ्यासाचा घेतला टेन्शन; विद्यार्थ्याने केली आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पेपरचा अभ्यास झाला नसल्याच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या केली.अभ्यास न झाल्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये काय लिहिलणार; या टेन्शनमुळे एमसीएच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना मानकापूर येथील गोधनी रेल्वेलाईनवर काल बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.यश माने अस मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो एमसीएचा विद्यार्थी होता. तो व्हीएमव्ही महाविद्यालयात एमसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,यशचा बुधवारी सकाळी एमसीएचा पेपर होता.मात्र,रात्री बारा वाजताच्या सुमारास तो घरातून कुणालाही न सांगता निघून गेला.यश रात्री घरून निघून गेल्यावर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.मात्र तो कुठेही सापडला नसल्याने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी नातेवाईक गेले असता रेल्वेखाली उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.दुर्दैवाने तो तरुण यशच होता.यशचा मोठा भाऊ अतुल आयटी कंपनीत नोकरीला असून, वडील प्रकाश माने सुरक्षारक्षक आहेत.यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून,याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!