Monday, August 31, 2026
Homeमुंबईपॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली असते,पण त्याच चवीची तारीखच बदलली जात असेल तर..पोट खराब होणे,मळमळ,उलटी व इतर शारीरिक व्याधी झाल्याशिवाय राहणार नाही.अश्याच प्रकारे नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात पॅकेजिंगचा झोल अन्न व औषध प्रशासन विभाग(एफडीए)व नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणून तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त  केला आहे.प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा,२००६ आणि भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये संबंधित आस्थापनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर ‘साधना एंटरप्रायझेस’चा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,पॅकेजिंगचा झोल हा अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील एक्सपायरी डेट बदलून ते पुन्हा बाजारात फ्रेश माल म्हणून विक्रीस पाठविण्यात येणार होता. कारवाईदरम्यान प्रशासनाने दहा नामांकित निर्यातदार कंपन्यांशी संबंधित तब्बल ८ हजार ४४२ कार्टन जप्त केले आहेत; ज्याची किंमत ७५ लाख २१ हजार २६९ रुपये आहे.यामध्ये प्रामुख्याने लेज कंपनीचे क्लासिक सॉल्टेड,मॅजिक मसाला,स्पॅनिश टँगी टोमॅटो,सिजलिंग हॉट,लेमन चिली आणि हॉट अँड स्वीट प्रकारच्या बटाटा चिप्सचा समावेश आहे.तसेच कुरकुरे व फन फ्लिप्सचे विविध मसालेदार प्रकारच्या कॉर्न स्नॅक्स,मॅगी नूडल्स, रसोइ ब्रँडचे पनीर टिक्का मसाला,दम आलू,पनीर भुर्जी आणि नॉर मश्रूम सूप यांसारखे इन्स्टंट नूडल्स व रेडी-टू-ईट अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.याशिवाय हेलमन मयाँगनेज,तसेच थम्स अप व लिमका कॅन ड्रिंक्स या सॉसेस आणि पेयांचाही यात समावेश आहे.मेसर्स युनिक फॅग्रन्स,मेसर्स प्रिस्टाइन वर्ल्डवाईड आणि मेसर्स विपुन दोशी यांच्याकडे कोणतीही कायदेशीर खरेदी पावती किंवा एफएसएसआय परवाना नसल्यामुळे त्यांच्याकडील विनालेबल व विनापरवाना असलेला सुमारे तीस हजार सहाशे रुपयांचा अतिरिक्त मालही जप्त करण्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,तुर्भे येथील टीटीसी इंडस्ट्रियल एरियामधील प्लॉट नंबर सी-४४९ वर असलेल्या ‘साधना एंटरप्रायझेस’ या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासन विभाग व नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.जयप्रकाश संचूरीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग यांच्या मालकीच्या या गोदामात नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.विविध नामवंत कंपन्यांचे खाद्यपदार्थ साठवून त्यांची अनधिकृतरीत्या रिपॅकिंग आणि लेबलिंग करण्याचे काम सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने उत्पादनाच्या मूळ पॅकेजिंगवरील तारीख व एक्सपायरी डेट पुसून त्यावर नवीन तारीख छापली जात होती.तसेच काही पदार्थांच्या मूळ घटकांवर आणि न्यूट्रिशिअन माहितीवर नवीन स्टिकर लावून ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकारामुळे पैश्याच्या लालसेने अंदाधुंद कारभार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा गोरखधंदा अनेकांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!