Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीपुरात अडकलेल्या गर्भवती महिलेसाठी प्रशासनाची धाव; महिलेने गोंडस कन्येला दिला जन्म..

पुरात अडकलेल्या गर्भवती महिलेसाठी प्रशासनाची धाव; महिलेने गोंडस कन्येला दिला जन्म..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा हिला आज,बुधवार २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)पथकाच्या मदतीने पामूलगौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आज सकाळी तिने गोंडस कन्येला जन्म दिला आहे.
छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीची पातळी वाढली होती.संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काल मंगळवारी संध्याकाळपासून सतत लक्ष ठेवले होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार काल रात्री ११ वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भामरागड येथे रवाना करण्यात आले.या तत्पर कारवाईमुळे गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.दरम्यान,भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचे पाणी शिरले असून सुमारे ३० ते ३५ दुकानांत पाणी आहे.मात्र, प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी काल रात्रीच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठे नुकसान टळले आहे.लगतच्या भागात पावसाचे प्रमाण सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!