Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीपुढील २४ तासांसाठी.. गडचिरोलीसह नागपूर,भंडारा,गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा...

पुढील २४ तासांसाठी.. गडचिरोलीसह नागपूर,भंडारा,गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-भारतीय हवामान विभाग (IMD), नागपूरने गडचिरोली जिल्ह्यासाठी आज,गुरुवार २४ जुलै करिता ऑरेंज अलर्ट आणि २५ जुलैकरिता रेड अलर्ट जारी केला आहे.या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस,तसेच २५ जुलै रोजी अत्याधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज,गुरुवार २४ जुलै रोजी जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त,नागपूर,भंडारा,गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी येलो/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान विभागाने वैनगंगा,वर्धा,प्राणहिता,इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोलीतर्फे नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा👇
पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे,कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,अतिवृष्टीच्या काळात नदी, तलाव,बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ जाणे टाळावे आणि पर्यटकांनी उचित सतर्कता बाळगावी,सेल्फी काढण्याचा मोह टाळावा,नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.
​नदी/नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असतांना कोणीही पूल ओलांडू नये,​जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
​आपत्कालीन मदत आणि माहितीसाठी संपर्क:
​आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा:
​दूरध्वनी: ०७१३२-२२२०३१ / ०७१३२-२२२०३५
​मोबाइल: ९४२३९११०७७ / ८२७५३७०२०८ / ८२७५३७०५०८
​मान्सून कालावधीतील पावसाची आकडेवारी,बंद रस्त्यांची माहिती,धरण व नद्यांची पाणी पातळी/विसर्ग,तसेच हवामान अंदाज इत्यादी अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा:
​व्हॉट्सॲप चॅनल लिंक: https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!