- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पर्यावरण,वन व हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनुसार पुढील पाच वर्षांत टप्याटप्याने आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे,पहिल्या टप्प्यात दोन उपप्रौढ वाघिणींची निवड करण्यात असून त्यापैकी एक वाघीण बुधवार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातून यशस्वीरीत्या पकडण्यात आली होती.तिची आरोग्य तपासणी करून तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले आहे.सदरची मोहीम वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला(क्षेत्र संचालक, टीएटीआर)यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती.यामध्ये उपसंचालक (बफर)आनंद रेड्डी,मुख्यालय उपवनसंरक्षक सचिन शिंदे,सहाय्यक वनसंरक्षक एस.एस.दुबे व अनिरुद्ध धागे,तसेच परिक्षेत्र वनाधिकारी श्रीमती राऊत व त्यांची चमू,तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे व त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली होती.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावर वाघीणीवर रेडिओ कॉलर बसवून शास्त्रीय निरीक्षण केले जाणार आहे. त्याचबरोबर,पुढील काळात नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच इतर परिसरातून वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविण्यास पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.या ठिकाणाहून टप्याटप्याने वाघांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे.
- Advertisement -

