Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसान योजनेचे २ हजार लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता..!

पीएम किसान योजनेचे २ हजार लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या दोन हजार रुपयांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येऊ लागली आहे.पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २१ हप्ते वितरित करण्यात आले आहेत.अश्यातच शेतकरी बांधव २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.मागील काही दिवसांपासून हप्त्याबाबत चर्चा सुरू असून मागील फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता मिळेल,अशी अपेक्षा अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.मात्र,फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.त्यामुळे,अनेक शेतकरी २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.त्यातच,पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या,शुक्रवार १३ मार्च रोजी आसाममधील कोकराझार येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे या दिवशी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा होऊ शकतात,अशी माहिती विविध सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.मात्र,याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर स्पष्टता येणार आहे.मात्र,१३ मार्चची संभाव्य तारीख समोर आली आहे.समजा,सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली,तर देशातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २ हजार रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!